पळसंबच्या ज्येष्ठ नागरीक सेवा संघाच्या सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर.
आचरा |प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या ज्येष्ठ नागरीक सेवा संघ, पळसंब यांची १५ ऑगस्टला सर्व साधारण सभा आयोजीत करण्यात आली आहे.
दुपारी २ वाजता श्री. आई जयंती देवी मंदिरात ही सभा संपन्न होणार आहे तरी ज्येष्ठ नागरीक सेवा संघाच्या सर्व सभासदांनी तिथे उपस्थित रहायचे आवाहन अध्यक्ष श्री. दादा गांवकर ( पुजारे ) व उपाध्यक्षा श्रीमती रतिका गोलतकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)