ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा ; शाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाकडून करण्यात आले विशेष आयोजन.

बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा ; शाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाकडून करण्यात आले विशेष आयोजन.

प्रकाशन: 10 Aug 2023 04:13 AM
वाचन संख्या 506

ग्रा.पं सदस्य तथा उद्योजक रत्नाकर आगलावे यांनी केले विशेष मार्गदर्शन.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील व्ही. एन. नाबर स्कूल मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यातूनच विद्यार्थी घडत असतात. शालेय स्तरावर छोट्या छोट्या कौशल्यातुनच विद्यार्थी यशस्वी होत आहे असे मत ग्रा.पं सदस्य तथा उद्योजक रत्नाकर आगलावे यांनी व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडिअम स्कूल बांदा मधील जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांदा गावचे सरपंच श्रीमती प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगांवकर सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक भाऊ वळंजू, उद्योजक शशी पित्रे प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई शाळेचा माजी विद्यार्थी साहिल बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

उद्योजक रत्नाकर आगलावे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चिती आत्ताच निश्चित केली पाहिजे तरच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं भविष्यात सोपे होईल सोपं होईल. शिक्षणाबरोबरच कौशल्य शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. पुढील तंत्रज्ञान शिक्षणाकडे वळताना विद्यार्थ्यांना एम. एस. एफ. सी. विषयासारख्या कौशल्य शिक्षणाची आता खरी गरज आहे म्हणूनच आपल्या प्रशाळेत संस्थेने हा विषय सुरू ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली पाहीजे. तरच तुम्ही आपल्या धैर्यापर्यंत पोहचू शकता असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनी व्यक्त केले. ध्येय निश्चित करण्यामध्ये कौशल्य विकास तुम्हाला मदत करत असल्याचे मत माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगांवकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले. कौशल्य दिन कार्यक्रमाचे योग्य नियोजन एम. एस. एफ. सी.विभागाने केल्याचे मत बोलताना व्यक्त केले. इयत्ता नववी व दहावी मधील एम.एस.एफ.सी विषयामधील इंजिनिअरिंग ड्राँईंग चा खरा फायदा मला आता शिकत असलेल्या मरीन इंजिनिअरिंग शिक्षणासाठी झाला असल्याचे मत शाळेचा माजी विद्यार्थी साहील बांदेकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती विभागाच्या निदेशिका सौ.गायत्री देसाई, व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांची ओळख ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक श्री.भूषण सावंत तर सूत्रसंचालन एम.एस.एफ.सी. विभागाचे समन्वयक श्री.राकेश परब यांनी केले. आभार इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांनी श्रीशा सावंत हीने मानले. यावेळी निदेशिका सौ.रिया देसाई, सहाय्यक शिक्षिका सितारा मांद्रेकर, स्नेहा गावडे, तृप्ती परब, डिसोजा उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स