ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मर्डे ग्रामपंचायतचे मालवण तहसीलदारांना निवेदन ; अनधिकृत वाळू उत्खननाबाबत केली कारवाईची मागणी.

मर्डे ग्रामपंचायतचे मालवण तहसीलदारांना निवेदन ; अनधिकृत वाळू उत्खननाबाबत केली कारवाईची मागणी.

प्रकाशन: 09 Aug 2023 10:21 PM
वाचन संख्या 211

परप्रांतीय कामगारांच्या त्रासाबद्दलही केली तक्रार.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याल्या कालावल खाडीपात्रामध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोत जुवा बेटाच्या आसपास काही अज्ञात अनधिकृत वाळू उत्खनन करत असून या वाळू उत्खननामुळे खोत जुवा बेटाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित अनधिकृत वाळू उत्खनन बंद करावे यासाठी मर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी बुधवारी दुपारी मालवण तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांना लेखी निवेदन सादर केले. मालवण तालुक्यातील कालावल खाडीमध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोत जुवा बेट असून त्यावर ती सर्वसाधारण १४५ एवढी लोकसंख्या आहे. या बेटा नजीक हडीकडील बाजूने मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा केला जात आहे. याबाबत खोत जुवा ग्रामस्थांच्या वतीने सुमारे ३८ लोकांच्या सहीचे पत्र मर्डे ग्रामपंचायतला सादर करून याबाबत कार्यवाही करण्यासाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने कालावल खाडीपात्रामध्ये सदरचा अनधिकृत वाळू उपसा चालू राहिल्यास बेटाला धोका पोहोचू शकतो. येथील स्थानिक माड बागायती शेतीसुद्धा धोक्यात येणार आहे.

याबाबत ग्रामस्थांनी संबंधित सर्व विभागाचे तसेच आपलेही लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते परंतु अद्याप पर्यंत यावर कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही. या ठिकाणी परप्रांतीय कामगार यांचा मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांना त्रास होत आहे.
याकरता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यासाठी सदर निवेदन सादर करण्यात आलेले आहे सदरचा अनधिकृत वाळू उपसा हा परप्रांतीयांच्या माध्यमातून होत असून कारवाई करत असताना होडीवर किवा रॅम्प वरती कारवाई केली जाते. हा कारवाई वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांवर आणि रॅम्पला जागा देणाऱ्या जमीन मालकांवर सुद्धा करण्यात यावी. तसे न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांचा रोष पाहता येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी सदर ग्रामस्थांना उपोषणास बसण्या शिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे होणारी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सर्व संबंधितांची राहील. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही अशी मागणी मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी मालवण तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी मर्डे उपसरपंच राजेश गांवकर, युवा कार्यकर्ते बाबू खोत आणि खोत जुवा येथील महिला, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स