ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शासनाचा निधी खाणाऱ्या सुनील घाडीगांवकर यांना जनहिताच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही : शिवसेना उ. बा.ठा. पक्षाचे शिरवंडे शाखाप्रमुख सुधीर घाडीगांवकर.

शासनाचा निधी खाणाऱ्या सुनील घाडीगांवकर यांना जनहिताच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही : शिवसेना उ. बा.ठा. पक्षाचे शिरवंडे शाखाप्रमुख सुधीर घाडीगांवकर.

प्रकाशन: 09 Aug 2023 08:22 PM
वाचन संख्या 471

आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करण्यापेक्षा गेली दिड वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे याचा विचार करावा असा प्रसिद्धी पत्राद्वारे सुधीर घाडीगांवकर यांनी दिला सल्ला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरवंडे शाखाप्रमुख सुधीर घाडीगांवकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे सुनील घाडीगांवकर यांच्यावर चौफेर प्रश्नांचा मारा करत हल्ला चढवला आहे. आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करणार्या सुनील घाडीगांवकर यांच्यावर त्यांनी प्रतिप्रश्नांची तोफ डागली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समितीचे सभापती राहिलेल्या सुनील घाडीगांवकर यांनी तलाठी सजावरून आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करून आपले अज्ञान प्रकट केले आहे. ठेकेदारी करून स्वतःच्या कुटुंबाचा विकास करणाऱ्या आणि निकृष्ट कामे करून शासनाचा निधी खाणाऱ्या सुनील घाडीगांवकर यांना जनहिताच्या प्रश्नावर बोलण्याचा मूलभूत अधिकार नाही. असरोंडी आणि शिरवंडे हे गाव भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठे असल्याने महसूल यंत्रणेने शासकीय निकषानुसार असरोंडी व आंबवणे आणि किर्लोस व शिरवंडे अशा प्रकारे लगत गावांची हद्द पाहून दोन वेगवेगळ्या सजा निश्चित केल्या. त्याबाबत हरकती मांडण्यासाठी त्याची अधिसूचना संबंधित सर्व गावांमधील ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. शिरवंडे ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे भाजपची सत्ता आहे. या कालावधीत सुनील घाडीगांवकर व त्यांच्या सरपंच यांनी या अधिसूचनेवर हरकत का घेतली नाही. त्यावेळी सुनील घाडीगावकर झोपले होते का असाही सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख सुधीर घाडीगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पूर्वी किर्लोस, असरोंडी, आंबवणे, शिरवंडे या गावांचा तलाठी सजा एकत्र होता त्यामुळे लोकांची कामे अनेक दिवस प्रलंबित राहत होती. नागरिकांना ताटकळत रहावे लागत होते. वारंवार तलाठी सजा मध्ये फेऱ्या घालाव्या लागत होत्या. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी दोन सजा मंजूर करून घेतले. परंतु महसूल यंत्रणेने शासकीय निकषानुसार सजामधील गावांची निश्चिती केली. असरोंडी आणि शिरवंडे हे गाव भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून मोठे असल्याने असरोंडी व आंबवणे आणि किर्लोस व शिरवंडे अशा प्रकारे लगत गावांची हद्द पाहून दोन वेगवेगळ्या सजा करण्यात आल्या. ही कार्यवाही होत असताना याबाबतची अधिसूचना हरकती मांडण्यासाठी संबंधित सर्व गावांमधील ग्रामपंचायत मध्ये १५ दिवस प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. शिरवंडे ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे भाजपची सत्ता आहे. या कालावधीत सुनील घाडीगांवकर व भाजपच्या सरपंच यांनी या अधिसूचनेवर हरकत का घेतली नाही. सुजाण नागरिकांच्या केवळ दोनच हरकती शासकीय यंत्रणेकडे प्राप्त झाल्या. त्यावर मंडळ अधिकारी यांनी अहवाल सादर केला आहे.

आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करण्यापेक्षा गेली दिड वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे याचा विचार करावा या दीड वर्षात सुनील घाडीगांवकर यांनी शिरवंडे तलाठी सजा आणि गांवच्या विकासासाठी काय प्रयत्न केले याचा खुलासा त्यांनी करावा असे प्रसिद्धी पत्राद्वारे शिरवंडे शाखाप्रमुख सुधीर घाडीगांवकर यांनी प्रति आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स