ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जर्नालिझम युनियन तर्फे पत्रकारांच्या मुलांचा होणार सत्कार ; १४ ऑगस्टपर्यंत नांवे पाठवायचे आवाहन.

जर्नालिझम युनियन तर्फे पत्रकारांच्या मुलांचा होणार सत्कार ; १४ ऑगस्टपर्यंत नांवे पाठवायचे आवाहन.

प्रकाशन: 09 Aug 2023 04:43 PM
वाचन संख्या 97

कणकवली | गणेश चव्हाण : ‘जर्नालिझम युनियन ऑफ महाराष्ट्र’ तर्फे सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या दहावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा, १९ ऑगस्टला तरेळे येथे सत्कार सोहळा आयोजित केला गेला आहे. यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या मुलांची नांवे पत्रकार संजय खानविलकर, तरेळे यांचेकडे पाठवावीत असे आवाहन निर्भय शासनचे संपादक व युनियनचे कोकण विभागिय अध्यक्ष सतिश साटम यांनी केले आहे.

इंडियन जर्नालिझम युनियनचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करुन शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवारी १९ ऑगस्टला दुपारी ३ वाजता तरेळे येथे होणार आहे. सन २०२३ मध्ये दहावी, बारावी व पदवी उत्तिर्ण झालेल्या मुलांची नावे व माहिती १४ ऑगस्ट पर्यंत पत्रकार संजय खानविलकर तरेळे व पत्रकार गणेश चव्हाण ( ९४२००८४१२५ ) यांच्या कडे लवकर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नारायण पांचाळ, कोकण विभाग प्रमुख सतिश साटम हे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स