'आप' (आम आदमी पक्ष) च्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी विवेक ताम्हणकर ; लवकरच घेणार अरविंद केजरीवालांची भेट.
कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आप(आमदार आदमी पक्ष) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विवेक ताम्हणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी तथा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया व प्रदेश संघटन मंत्री रियाज पठाण यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेला साजेशे आणि भ्रष्टाचार निर्मुलनासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यावेळी म्हणाले. लवकरच दिल्ली येथे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विवेक ताम्हणकर हे विद्यार्थी दशेपासून परिवर्तनाच्या चळवळीत काम करतात. गेली दोन दशके ते विविध माध्यमातून जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थी चळवळीच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईत आपल्या काही समविचारी सहकाऱ्यांसोबत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी तथा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांची आज पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)