ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅटट्रीक साधणार ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास.

आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत हे विजयाची हॅटट्रीक साधणार ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचा विश्वास.

प्रकाशन: 07 Aug 2023 10:44 PM
वाचन संख्या 379

महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे असा दिला सल्ला.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण येथील पक्षाच्या तालुका शाखेत आज एक पत्रकार परीषद घेतली. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की आगामी निवडणुकीत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची हॅटट्रीक होणार असा विश्वास आहे. याच दरम्यान त्यांनी विरोधकांच्या विविध टीकांचा समाचार घेतला. भाजपा व राणे कुटुंबियांनी मागील पराभवातून बोध घ्यायचाही त्यांनी सल्ला दिला.

माजी खासदार डाॅ. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना आपण कोणावर टिका करतो याचाही विचार त्यांना राहिलेला नाही असे सांगितले. भूतपूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल संपूर्ण देशाने कौतुक केले आहे आणि भविष्यातील निवडणुकांमध्येही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असल्याचे माहीत असल्यानेच भाजप निवडणुका घेण्यास घाबरत आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. राणे बंधुनी स्वतःला लगाम लावला नाही तर त्यांना ठाकरे शिवसेनेच्यावतीने रस्त्यावर उतरून योग्य तो धडा शिकवला जाईल असा इशाराही हरी खोबरेकर यांनी यावेळी दिला. कणकवली -देवगड- वैभववाडी मतदार संघात जागोजागी खड्डे दिसतील परंतु कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातील खड्डा शोधण्यासाठी माजी खासदार डाॅ निलेश राणे यांना पायपीट करावी लागली होती असा उपरोधक टोला त्यांनी लगावला. महागाई, बेरोजगारी, बंद होत असलेले उद्योगधंदे यावर कधीतरी राणे बंधुनी भाष्य करावे आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाऊन जनतेच्या समस्या सुटणार नाहीत तर जनतेला अपेक्षीत असलेले काम आजही भाजपकडून होत नसल्याचे चित्र असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.

या पत्रकार परिषदेला मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, प्रविण लुडबे, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, वेर्लेकर असे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स