ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
महसूल सप्ताह निमित्त मसुरेत विविध दाखल्यांचे वितरण ; मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांच्या उपक्रमाची प्रशंसा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महसूल सप्ताह निमित्त मसुरेत विविध दाखल्यांचे वितरण ; मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांच्या उपक्रमाची प्रशंसा.

प्रकाशन: 04 Aug 2023 08:05 PM
वाचन संख्या 309

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘महसूल सप्ताह निमित्त’ महसूल प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीम.वर्षा झालटे (तहसीलदार महोदया, मालवण ) यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे मसुरे मंडळ कार्य क्षेत्रात श्री. सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक तसेच ग्रामस्थांच्या विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व महसूलच्या विविध योजनांची व कामकाजाची माहिती उपस्थित सर्वांना देण्यात आली.

यावेळी बोलताना मसुरे मंडल अधिकारी श्री सुहास चव्हाण म्हणाले महसूल सप्ताह मसुरे मंडल अधिकारी कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांनी संपन्न होत आहे. महसूल मधील सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही विद्यार्थी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला यांना मसुरे मंडळ महसूलच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. ग्रामस्थांना विविध दाखले सुलभरीत्या मिळण्यासाठी आपण व आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व महसूल कर्मचारी योग्य ते सहकार्य करणार आहोत. मसुरे मंडळ कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी महसूलच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.

यावेळी श्री.आर.एस.शेजवळ तलाठी त्रिंबक, एस.पी.लखमोड तलाठी देऊळवाडा, मसुरे सेतूचे नवनाथ गोसावी, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, विश्वास पोळेकर, डाटा ऑपरेटर प्रतीक्षा परब, विनायक गांवकर, श्रीकांत खोत, बागवे हायस्कूल प्राचार्य सौ अर्चना कोदे, रमेश पाताडे, श्री पांगुळला, एस डी बांदेकर, एन एस जाधव, समीर नाईक,भानुदास परब, डी पी पेडणेकर, अनिल मेस्त्री, देऊळवाडा शाळा मुख्याध्यापक एस आर कांबळे, सौ मसुरेकर मॅडम, श्री चौगुले सर मसुरे महसूल कर्मचारी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ज्येष्ठ ग्रामस्थ व लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका अर्चना कोदे म्हणाल्या की मसुरे मंडळ अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम केला असून याबाबत या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे यापुढेही त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असेच लोकाभिमुख कार्यक्रम हाती घ्यावेत.

यावेळी सर्व संबंधित कोतवाल, डाटा ऑपरेटर व सेतूचालक यांचे समवेत आर.पी.बागवे हायस्कूल मसुरे व भरतगड हायस्कूल देऊळवाडा या ठिकाणी विविध शैक्षणिक दाखल्यांचे वितरण व मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनेची माहिती मंडळ अधिकारी चव्हाण व सर्व तलाठी यांजकडून देण्यात आली.तसेच घरोघरी जाऊन शैक्षणिक व संजय गांधी अनुदान लाभाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत देऊळवाडा येथे नवीन मतदार नोंदणीबाबत, मयत खातेदारांच्या वारस तपासाबाबत गाव नमुना नं.आठ अ चे वाचन तलाठी यांजकडून करण्यात आले. तसेच सलोखा योजनेबाबतची माहिती मंडळ अधिकारी मसुरे यांनी उपस्थितांना दिली. तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी सैनिक हो तुमच्यासाठी या सैन्यदलातील सैनिक तसेच वीरपत्नी यांची प्रलंबित प्रकरणे किंवा प्रश्न असतील तर अशा प्रकरणांबाबत उद्या ०५ ऑगस्टला मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून चर्चा करण्यात येईल व त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन श्री.सुहास चव्हाण (मंडळ अधिकारी मसुरे) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स