सोनाळी नावळे ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात मोर्चा; आरोपीला फाशी द्या…मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी…
वैभववाडी/प्रतिनिधी:-आरोपीला फाशी झालीच पाहिजे… पोलीस प्रशासन जिंदाबाद… अशा प्रकारच्या घोषणा देत सोनाळी आणि नावळे गावातील ग्रामस्थांनी सोनाळी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन निखार्गे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तसेच वैभववाडी पोलिसांनी जलद तपास करून आरोपीला गजाआड केले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुकास पात्र आहेत. परंतु या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, भर चौकात फाशी झाली पाहिजे, अशा घोषणा महिलांनी देत आपला क्रोध व्यक्त करीत होत्या. सुमारे http://localhost/news/public/uploads/200 हून अधिक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या, एकूणच या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या नातेवाईकांना ही गावात थारा देऊ नये अशी मागणी महिलांनी केली आहे.या आंदोलनात सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सोनाळी नावळे गावातील ग्रामस्थांसह शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस अशा सर्व पक्षाचे सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांना आमदार नितेश राणे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करावा अशा सूचनाही दिल्या. तसेच पोलीस निरीक्षक मेगडे यांनी जमावाला सामोरे जात आपल्या भावनांशी सहमत आहे, आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने तपास सुरू आहे. शिक्षा देण्याचा अधिकार मा. कोर्टाला आहे आमचा तपासाचा भाग आहे, आम्ही त्या दृष्टीने तपास केलेला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी सोनाळी सरपंच भिमराव भोसले, नासीर काझी, अरविंद रावराणे, प्रमोद रावराणे, स्नेहलता चोरगे, स्नेहा कदम, नावळे सरपंच कु. सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)