ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली अश्या नवीन बस फे-या चालू करा व सडूरे शिराळे मार्गावरील बस वेळापत्रकानुसार सोडा-अन्यथा संघर्ष अटळ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली अश्या नवीन बस फे-या चालू करा व सडूरे शिराळे मार्गावरील बस वेळापत्रकानुसार सोडा-अन्यथा संघर्ष अटळ

प्रकाशन: 03 Aug 2023 02:38 PM
वाचन संख्या 35

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचा एसटी महामंडळाला इशारा

वैभववाडी/ प्रतिनिधी : सध्या वैभववाडी शिराळे मार्गावरील एसटी बस सेवा विस्कळीत झालेली दिसताच भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका पाटील, शिराळे बूथ अध्यक्ष भाजपा विजय पाटील यांनी वाहतूक नियंत्रक बाबू गुरखे यांची भेट घेत ग्रामस्थांच्या सह्या घेतलेले दिले निवेदन सदर निवेदन विभागीय नियंत्रण कार्यालय कणकवली यांना देण्यात आले. या निवेदनात श्री काळे शिराळे येथील सर्व बसेस वेळापत्रकानुसार चालू करून विस्कळीत झालेली बस सेवा त्वरित सुरू करावी मानव विकासच्या गाड्या बंद असताना रेगुलर गाड्या शिराळे गावापर्यंत सोडाव्यात. रोजच्या वेळापत्रकानुसार गाड्या सुटावेत अशी केली मागणी त्याचप्रमाणे कुर्ली गाव हे वैभववाडी तालुक्यात आहे का असा.. असेल तर मग वैभववाडी तालुक्यातून कुर्ली आणि कुर्ली गावातून वैभववाडी तालुक्यात येणारी एकही बस सेवा का नाही असा प्रश्न करत मागे दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत वैभववाडी (सडुरे तांबळघाटी) मार्गे कुर्ली एसटी बस फेऱ्या त्वरित चालू कराव्या अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा काळे यांनी आपल्या निवेदनातुन दिला आहे. काळे यांनी केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या तर सडूरे शिराळे कुर्ली सहित अरुळे, निम अरुळे, सांगुळवाडी या गावातील प्रवेश यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मागणीनंतर एसटी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स