ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'ओह माय गाॅड २' सिनेमा सेन्साॅरच्या कचाट्यात ; लैंगिक शिक्षणाचा विषय व संवाद यामुळे 'फक्त प्रौढांसाठी' तथा 'ए' प्रमाणपत्राचीही शक्यता.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'ओह माय गाॅड २' सिनेमा सेन्साॅरच्या कचाट्यात ; लैंगिक शिक्षणाचा विषय व संवाद यामुळे 'फक्त प्रौढांसाठी' तथा 'ए' प्रमाणपत्राचीही शक्यता.

प्रकाशन: 26 Jul 2023 07:51 PM
वाचन संख्या 137

सिनेपट | प्रतिनिधी : अक्षय कुमारचा अभिनय असलेला बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘ओ एम जी २’ सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच जोरदार झटका लागल्याचे सूत्रांकडून समजते. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्ये अडकला आहे. सेन्सॉर बॉर्डाने प्रमाणपत्र देण्याआधी हा चित्रपट पुनर्विचार समिती कडे पाठवला. आता या रिव्हाईजिंग कमिटीने या चित्रपटामध्ये २० ठिकाणी कात्री चालवण्याची संकलन शिफारस केली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या पुनर्विचार समितीनेही या सिनेमावर आक्षेप नोंदवला असून सिनेमेला ‘ए’ म्हणजेच फक्त प्रौढांसाठी प्रमाणपत्र देण्याबाबत बोलले आहे. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या सर्व बदलांनंतरच ‘ओह माय गॉड २’ ला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. पण CBFC ने सुचवलेले सर्व बदल आणि रिव्हाईजिंग कमिटीचं चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्याबाबत बोलणे चित्रपटाच्या निर्मात्यांना मान्य नाही. या संदर्भात चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे मांडायचे आहे, अशीही माहिती सूत्रांकडून समजते आहे.

अक्षय कुमारचा चित्रपट ‘ओह माय गॉड २’ हा केवळ धर्म आणि श्रद्धेवर आधारित सिनेमा नसून या चित्रपटाचा मूळ विषय हा लैंगिक शिक्षण आहे. अशा परिस्थितीत धर्म आणि लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड गांभीर्याने विचार करत आहे.

‘ओएमजी २’ या चित्रपटाच्या टीझरमधील एका दृष्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. या सीनमध्ये दिसले की रेल्वेच्या पाण्याने अक्षयचा अभिषेक केला जात आहे. ‘ओएमजी २’ या चित्रपटात अक्षय कुमार, त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील ‘ऊंची ऊंची वादी’ हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स