ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश ; हिंदी व मराठी सिनेमा आणि नाटकांतून केल्या होत्या भरीव भूमिका.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश ; हिंदी व मराठी सिनेमा आणि नाटकांतून केल्या होत्या भरीव भूमिका.

प्रकाशन: 24 Jul 2023 12:42 PM
वाचन संख्या 117

ब्युरो न्यूज | मुंबई : पुलंचा ‘अंतू बर्वा’ पुन्हा जागवलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. काल संध्याकाळपासून ते वेंटीलेटरवर होते.

जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या २० व्या वर्षी, १९५५ पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, रोहीत शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर व सिनेमात वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, आणि देवयानी याही नाटकांतून जयंत सावरकर यांनी वेगळा ठसा उमटवलेला होता. अलीकडच्या काळातील ‘सिंघम’ सिनेमा व ‘समांतर’ वेबसिरीज मध्येही त्यांनी चरित्र अभिनय केला होता. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेमा सृष्टीतील अनेक जणांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स