बांदा येथील सायराबी ख़तीब कालवश.
बांदा उपसरपंच तथा भा.ज.यु.मो चे जिल्हा उपाध्यक्ष जावेत ख़तिब यांच्या मातोश्री होत.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा मुस्लिमवाडी येथील सायराबी हुसेन ख़तीब (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने काल दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सून नातवंडे असा परिवार आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा गोवा येथे रुग्णालयात दाखल केले असता तेथे निधन झाले. भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा उपसरपंच जावेद ख़तीब यांच्या त्या मातोश्री होत.
सायराबी हुसेन ख़तीब यांच्या निधनाने सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)