उद्या नाभिक दशावतार नाट्यप्रेमींच्या मेळाव्याचे आयोजन ; सिंधुदुर्ग नाभिक कमिटीचा विशेष पुढाकार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे उद्या २४ जुलैला सकाळी १०:३० वाजता ‘नाभिक दशावतार नाट्यप्रेमी आणि सिंधुदुर्ग नाभिक कमिटी’ सदस्य एकत्र येऊन स्नेहमेळावा संपन्न होत आहे. या स्नेहमेळ्यात नाभिक समाज प्रबोधन , नाभिकांची उत्पत्ती व काही विषयांवर चर्चा होणार आहे. तरी सर्व तालुकाध्यक्ष यांनी उपस्थित राहून त्यांचा सहभाग अनिवार्यपणे नोंदवायचा आहे.
या मेळाव्याला राज्य संघटक विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, नाभिक नेते अनिल अणावकर, सुधीर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, माजी तालुकाध्यक्ष कुडाळ नितेश पिंगुळकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रतिभाताई चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गणेश चव्हाण, मुख्य मार्गदर्शन यशवंत तेंडुलकर(तेंडोली), मार्गदर्शन अनंत चव्हाण ता. कणकवली ( करंजे ) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी आयोजीत या स्नेहमेळाव्याला सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी उपस्थित रहायचे व हा संदेश सर्वांपर्यंत पोचवायचे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर चव्हाण कणकवली तालुकाध्यक्ष, रोशन चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष तेजस्विनी कुबल यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)