ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
यापुढे आमच्या नेत्यांवर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यावर नाहक टीका केली तर प्रकाश सावंत यांचे इतर कारनामे देखील बाहेर काढावे लागतील : युवासेना कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

यापुढे आमच्या नेत्यांवर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यावर नाहक टीका केली तर प्रकाश सावंत यांचे इतर कारनामे देखील बाहेर काढावे लागतील : युवासेना कणकवली उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर.

प्रकाशन: 22 Jul 2023 06:47 PM
वाचन संख्या 129

युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर आक्रमक ; वरवडे गांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबद्दल माजी सभापती प्रकाश सावंत यांच्यावर केला पलटवार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर यांनी माजी सभापती प्रकाश सावंत यांच्या विविध आरोपांवर माध्यमांना प्रसिद्धीपत्राद्वारे कळवत शाब्दिक पलटवार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबद्दल माजी सभापती प्रकाश सावंत यांनी बोलताना त्या इमारतीच्या कामातून टक्केवारी कुणी घेतली त्याचे अगोदर आत्मपरीक्षण करावे तसेच सुशांत नाईक हे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून सक्षम काम करत असताना त्यांनी कुडाळ मतदारसंघामध्ये फिरण्यापेक्षा प्रकाश सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या महिला बाल रुग्णालयाची पाहणी करावी. त्यानंतर त्यांना नितेश राणे कसे अकार्यक्षम ठरले याचा अनुभव येईल. गेली तीस वर्ष सत्तेत असणाऱ्या राणेंना कणकवली मतदारसंघात महिला बाल रुग्णालय सुरू करता आले नाही. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील एक आदर्शवत असे महिला बाल रुग्णालय कुडाळ मध्ये करून दाखवले. कुडाळ सह जिल्ह्यातील रुग्ण या रुग्णालयात कसे उपचार घेतात ते प्रकाश सावंत यांनी पहावे. त्यानंतर प्रकाश सावंत स्वतःच नितेश राणे अकार्यक्षम असल्याचे मान्य करतील. तसेच सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्टंटबाजीची केलेली चिरफाड जर प्रकाश सावंत यांना एवढी जिव्हारी लागत असेल तर प्रकाश सावंत यांनी बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव जाहीर करावे आणि त्यांच्याच आमदारांना सांगून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. ही हिम्मत प्रकाश सावंत हिम्मत दाखवतील काय? वरवडे मध्ये काम मंजूर झाल्यावर दहा टक्के दर कोणाचा चालू आहे? तेथे ठेकेदार कामे करायला का येत नाहीत याचे आत्मचिंतन प्रकाश सावंत यांनी करावे. अन्यथा कोणत्या कामांमधून कोणी व किती टक्केवारी घेतली ते सुद्धा येत्या काळात नावाने ही जाहीर करण्याची वेळ येईल असा इशारा युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांनी दिला आहे.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष झोपा काढत होते का? ते देखील प्रकाश सावंत यांनी जाहीर करावे की रुग्ण कल्याण समिती अध्यक्षांसोबत सावंत यांची मिली भगत होती. माजी सभापती राहिलेल्या प्रकाश सावंत यांना त्यांच्या गावातील वरवडे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षातील ताकदवान गटाने ग्रामपंचायतीसाठी गावात दारोदार फिरवले त्याचा देखील त्यांनी अभ्यास करावा. प्रकाश सावंत यांचे हे केवळ अर्धेच कारनामे बाहेर आले. यापुढे जर आमच्या नेत्यांवर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यावर त्यांनी नाहक टीका केली तर प्रकाश सावंत यांचे इतर कारनामे देखील बाहेर काढावे लागतील असा इशारा सचिन आचरेकर यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स