ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार आदित्य ठाकरे यांचा राज्य व केंद्रावर हुकूमशाहीचा आरोप ; मणिपूर घटना व बि. एम. सी. मध्ये पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयाबद्दल व्यक केला संताप.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार आदित्य ठाकरे यांचा राज्य व केंद्रावर हुकूमशाहीचा आरोप ; मणिपूर घटना व बि. एम. सी. मध्ये पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयाबद्दल व्यक केला संताप.

प्रकाशन: 21 Jul 2023 01:41 PM
वाचन संख्या 137

मुंबई | ब्युरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर हुकुमशाहीचा आरोप करुन मणिपूर मधील घटनेची जाहीर निंदा केली आहे. आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जाहीर टीका केली.

मणिपूर मधील घटनेची जाहीर निंदा करताना आमदार आदित्य ठाकरे यांनी मणिपूर सरकारच्या निष्क्रीयतेबद्दल ते बरखास्त केले जावे व तिथे राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असे सांगितले. त्या दुर्देवी घटनेमध्ये कारगील मध्ये लढलेल्या एका सुभेदार जवानीचीही पत्नी अत्याचाराचा बळी ठरली आहे हेही गंभीर आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मणिपूर मधील घटना ही केवळ नाते संबंध किंवा नुसते वाईट वाटायची नसून ती एक भारतीय म्हणून जागतीक स्तरावर मान खाली घालायला लावणारी असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक नागरीकाला संताप व चीड आणणारी ती अमानवी घटना असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार निष्क्रीय असल्यानेच न्यायालयांना तिथे क्रीयाशील व्हावे लागते असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे. मागे एकदा बलात्कारी माणसाचे गुजरातमध्ये स्वागत झाले आहे त्यामुळे निर्लज्जपणा व क्रूरतेबद्दल आपण काय बोलावे हा प्रश्न असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

बी.एम.सी. मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांनी ते कार्यालय २४ तासांत बंद करावे अन्यथा मुंबईतून या हुकुमशाही विरुद्ध काही परिणाम झाल्यास कोण जबाबदार असेल त्याचा राज्य सरकारने विचार करावा असे स्पष्ट केले. जर पालकमंत्र्यांना कक्ष असेल तर मुंबईतील आमदारांनाही बी. एम. सी. मध्ये तो कक्ष उपलब्ध असावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स