ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'मेरा बुथ सबसे मजबूत' पद्धतीने काम झाल्यास येत्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित ; केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे वेंगुर्लेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'मेरा बुथ सबसे मजबूत' पद्धतीने काम झाल्यास येत्या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित ; केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे वेंगुर्लेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

प्रकाशन: 21 Jul 2023 02:17 PM
वाचन संख्या 162

पंतप्रधान मोदींच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रबिंदू हा देशातील गरीब , वंचित , पीडीत , शोषित , दलीत , मागास माणुस असतो असल्याचे केले प्रतिपादन.

नवलराज काळे | सहसंपादक : भाजपाच्या लोकसभा प्रवास उपक्रमा अंतर्गत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी व केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत हद्दीत बुथ क्रमांक ५७ मधिल कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बुथ वर करणीय कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी बुथकमिटी व पन्ना प्रमुखांची जबाबदारी विशद केली.

यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचाविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. या सुधारणारया परराष्ट्र संबंधांचा लाभ देशातील सामान्य नागरिकांना मिळेल , याची काळजी ते घेतात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप यशस्वी होत आहे. मोदींच्या विचारांचा आणि कामाचा केंद्रबिंदू हा देशातील गरीब , वंचित , पीडीत , शोषित , दलीत , मागास माणुस असतो त्यामुळेच मोदी सरकार ने गेल्या ९ वर्षात अंत्योदयाच्या योजना आणल्या , त्यामुळेच गोर गरीब जनता विविध योजनांचे लाभार्थी बनले .

भाजपाला २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणूकांत स्वबळावर बहुमत मिळाले. भाजपाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निवडणूका जिंकून सरकारे स्थापन केली. ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवीले . पक्षाचा इतका अफाट विस्तार झालेला असताना आणि यश मिळालेले असताना पंतप्रधानांना पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांची काळजी असते. पक्षामध्ये सर्व सामन्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळेल असे वातावरण आहे. सामान्य कुटुंबातील अनेक कार्यकर्त्यांना भाजपा मध्ये नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची संधी मिळते. सर्वसामान्य जनतेप्रमाणे पक्षातील कार्यकर्त्यांनाही पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे कुटुंबप्रमुखांसारखे आधार वाटतात आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे .

शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर जनतेचे काम करणारे सरकार कसे असते याचा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे . याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाढी होणार आहे , तरी बूथवरील कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकार च्या विविध कल्याणकारी योजना आपल्या बुथ वरील मतदारांना जास्तित जास्त पोहचवाव्यात असे आवाहन केले . यावेळी मान्यवर म्हणून लोकसभा क्लस्टर चे सहसंयोजक प्रमोद जठार , लोकसभा मतदारसंघांचे संयोजक अतुल काळसेकर , ठाण्याचे जिल्हाध्यक्ष संदिप लेले , नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी जिल्हाध्यक्ष व सावंतवाडी विधानसभा निवडणूक प्रमुख राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर इत्यादी उपस्थित होते .

बैठकीच्या सुरुवातीलाच ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजयकुमार मिश्रा व अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी माजी सभापती सौ.सारीका काळसेकर , शक्तीकेंद्र प्रमुख विष्णु उर्फ पपु परब , बुथ प्रमुख संजय मळगांवकर , सरपंच सौ. शमिका बांदेकर , ग्रा.प.सदस्य हेमंत गावडे – सौ. स्वरा देसाई – सौ.सुहीता हळदणकर – सौ. कार्तिकी पवार – कृष्णाजी सावंत , रविंद्र परब , सत्यवान परब , दत्तात्रय धुरी , कृतीका साटेलकर , समिर चिंदरकर , समिर काळसेकर , पांडुरंग कांबळी , सुवर्णा सावंत , महेश कांबळी , सुभाष हळदणकर , मधुरा कांबळी , प्रवीण पानकर ,किरण पवार , महेश राऊळ , प्रथमेश सावंत , मोरेश्वर सावंत , विश्वास पवार , सायमन आल्मेडा , निकलस फर्नांडीस , अँना डिसोझा , सरीता परब , अर्चना परब , शांती देसाई , चंद्रकांत देसाई , सावळाराम साळगावकर , अजित गवंडे , अरुण गवंडे , सुनील भोवर इत्यादी पन्ना प्रमुख उपस्थितीत होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स