संतवाडी फाट्यावर भीषण अपघात ; १ जण जागीच मृत्युमुखी.
पुणे | ब्युरो न्यूज : पुण्यातील जुन्नर येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात काल एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे. पुणे-नाशिक महामार्गावर संतवाडी फाट्यावर काल हा भीषण अपघात झाला. या घटनेचा थरकाप उडवणार व्हिडीओ देखील समोर आला आहे.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडायचा होता. दुचाकीस्वाराने गाडी हळू करुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक समोरुन आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातातील कार चालकावर गुन्हा दाखल झाला असून आळेफाटा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)