ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पत्रकार निलेश मोरजकर यांना भास्कर अवॉर्ड' प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पत्रकार निलेश मोरजकर यांना भास्कर अवॉर्ड' प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार

प्रकाशन: 17 Jul 2023 09:55 PM
वाचन संख्या 35

बांदा /राकेश परब: येथील पत्रकार तथा नट वाचनालयाचे संचालक निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने नट वाचनालयाच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. श्री मोर्ये यांनी यावेळी श्री मोरजकर यांच्या कार्याचा गौरव करत आपण बांदा शहराच्या विकासासाठी पत्रकारितेतून योगदान दिले असून नट वाचनालयच्या माध्यमातून वाचन चळवळ अधिक सक्रिय करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, अमिता परब आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स