ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा

बांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा

प्रकाशन: 18 Jul 2023 10:20 PM
वाचन संख्या 36

बांदा /राकेश परब :बांदा-वाफोली मार्गावरील शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतचा रस्ता वाहतुकीस जीवघेणा ठरला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच मार्गावर अपघात होऊन एक जण गंभीर झाला असून उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले. गणेशोत्सव तसेच येथून ये जा करणारे प्रवासी, विद्यार्थी, गावातील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने निदान तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्याची मागणी वाफोलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक परब यांनी ग्रामस्थांच्यावतीने केली आहे. बांदा शंकराचा पुतळा ते पाटकर पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली असून रस्ता खड्डयांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी २०१९ पासून पाठपुरावा सुरू आहे. सदर रस्त्याचे काम मंजूर असून पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे बांदा ग्रामपंचायत मधून सांगण्यात आले. मात्र सद्यस्थितीत या खड्ड्यात व खचलेल्या मोरी पुलाजवळ अनेक अपघात झाले. त्यामुळे चार महिन्यांची वाट न पाहता तात्पुरत्या स्वरूपात तरी रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी अशोक परब व ग्रामस्थांनी केली. सदर मार्गावरील मोरीपूल रस्त्यापासून चार फूट लांब अंतरावर खचलेल्या स्थितीत आहे. अतिवृष्टी झाल्यास येथून ये जा करणाऱ्या वाहनचालक, प्रवासी, नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन उपाययोजना करावी असे काही वाहन चालकांनी सांगितले. दरम्यान, बांदा ग्रामपंचायतची संपर्क साधला असता अपघात टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करू. सदर रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर होणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स