ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - महेश इंगळेस्वामी दर्शनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घेण्याचे महेश इंगळेंनी केले आवाहन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - महेश इंगळेस्वामी दर्शनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घेण्याचे महेश इंगळेंनी केले आवाहन.

प्रकाशन: 17 Jul 2023 09:46 PM
वाचन संख्या 26

मसुरे | प्रतिनिधी : यंदाच्या अधिक श्रावण मासानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. अधिक मासात दिनांक १८ जुलै ते २० जुलै २०२३ अखेर सोलापूर येथील वारकरी सांप्रदायचे ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांची ३ दिवसीय भागवत कथा, दिनांक १७ जुलै ते २३ जुलै अखेर बदलापूर येथील स्वामीभक्त ठाकूर मामा व सहकाऱ्यांचे भक्तनिवास हॉलमध्ये श्री गुरुलिलामृत पारायण सप्ताह, दिनांक २२ जुलै रोजी मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, सहकाऱ्यांचे देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात २० वर्षाखालील मतिमंद गतिमंद मुलांसाठी होप फॉर होपलेस होमिओपॅथिक शिबिर, दिनांक २५ जुलै ते २७ जुलै अखेर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बदलापूर येथील प्रसाद गुरुजी व सहकाऱ्यांचा दत्तयाग, दिनांक २८ जुलै ते १ ऑगस्ट अखेर ह.भ.प.किशोर महाराज शिवणीकर यांची वटवृक्ष मंदिरात संगीत संत चरित्र कथा इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले, यंदा दिनांक१८ जुलैपासून अधिक श्रावण महिना सुरु होत आहे. खरे तर अधिक महीना ही अगदी साधी खगोलीय तरतूद आहे. इंग्रजी सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे तर आपल्या हिंदू संस्कृतीतील चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. दरवर्षी हा फरक ११ दिवसांचा असतो. दर तीन वर्षांनी हा फरक ३३ दिवसांचा होत असल्याने तो दूर करण्यासाठी १ अधिक मास येतो. तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्याचे महत्व, व्रते, दानधर्म, देवदर्शन करुन आपण मोलाचे बनवून वृद्धींगत करतोच. भाविकांनी व्रत, दानधर्म, स्वामी दर्शन यासह या धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी याप्रसंगी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स