ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज सकाळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले बांदेश्वरात दर्शन

येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज सकाळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले बांदेश्वरात दर्शन

प्रकाशन: 17 Jul 2023 09:38 PM
वाचन संख्या 72

बांदा /राकेश परब: येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज क्रेंद्रिय मंत्री श्री.श्रीपाद नाईक त्यांनी सकाळी भेट देऊन श्री.देव बांदेश्वर मंदिरात दर्शन घेतले.श्री.देव बांदेश्वर हे जागृत व भक्तांच्या हाकेला धावून येणारे देवस्थान आहे. मला याची प्रचिती वेळोवेळी आली आहे, त्यामुळे येथे नतमस्तक होण्यासाठी आलो आहे अशी प्रतिक्रिया यांनी दिली. येथील श्री देव बांदेश्वर मंदिराला आज त्यांनी सकाळी भेट देऊन बांदेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते श्रीफळ व कृपाप्रसाद देऊन मंत्री नाईक यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, बाळु मोर्ये, अशोक परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्रीयमंत्री नाईक म्हणाले की, श्री देव बांदेश्वरची महती अगाध असून आपण त्याचे निस्सीम भक्त आहोत. आपण वेळोवेळी ज्यावेळी संधी मिळेल त्या त्या वेळी याठिकाणी येऊन श्री बांदेश्वरचे दर्शन घेतो.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स