ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लब ऑफ बांदा प्रेसिडेंट पदी प्रमोद कामत यांची निवड उद्या १८ रोजी दिमाखदार सोहळ्यात होणार पदग्रहण
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लब ऑफ बांदा प्रेसिडेंट पदी प्रमोद कामत यांची निवड उद्या १८ रोजी दिमाखदार सोहळ्यात होणार पदग्रहण

प्रकाशन: 17 Jul 2023 07:17 PM
वाचन संख्या 64

बांदा / राकेश परब : बांदा रोटरी क्लबने स्थापनेच्या पहिल्याच वर्षी ४० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी माजी जि. प. सभापती प्रमोद कामत यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ सभागृहात जिल्हा गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

आनंदी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिवपदी नरसिंह काणेकर व खजिनदारपदी शिवानंद भिडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नूतन प्रेसिडेंट प्रमोद कामत, व्हाईस प्रेसिडेंट सुदन केसरकर, योगेश परुळेकर, रत्नाकर आगलावे, हनुमंत शिरोडकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, सचिन मुळीक, फिरोज खान, सिताराम गावडे उपस्थित होते.   

  प्रमोद कामत म्हणाले, स्थापनेच्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ बांदाने लक्षवेधी कामगिरी केली. वर्षभरात ४० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक स्तरावर काम करण्यात आले. आयुष रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा हजारो रुग्णांना फायदा झाला. परिसरातील ६ टीबी रुग्णांना दरमहा त्यांच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य वर्षभर पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप, युवतींना सॅनिटरी पॅड, वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मदत, वृक्षारोपण या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.   ते पुढे म्हणाले, बांदा रोटरॅक्ट क्लबने सुद्धा उल्लेखनीय काम केले. त्यामुळे पहिल्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. भविष्यातही रोटरीचे काम अधिक जोमाने करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स