ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भल्ली भल्ली भावय.....साळशी गावात भावई उत्सव जल्लोषात
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भल्ली भल्ली भावय.....साळशी गावात भावई उत्सव जल्लोषात

प्रकाशन: 16 Jul 2023 06:28 PM
वाचन संख्या 376

शिरगाव : प्रतिनिधी : ढोलताशांच्या गजरात व भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी हा उत्सव आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाला वरुणराजाने अधून मधून हजेरी लावली होती. या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाव मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाला सुरवात करून श्री पावणाई देवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावई म्हणत जल्लोषमय भक्तिमय वातावरणात भावई खेळली जाते. यामध्ये लहानथोर मंडळी मोठया उत्साहात सहभागी होतात. यावेळी एकमेकास खेळीमेळीच्या वातावरणात चिखल लावला जातो. तसेच होळदेव येथील मोठा दगड प्रत्येकजण दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. त्यानंतर जमिनीत खोल चिखलात पुरण्यात आलेला नारळ हस्त कोशल्याने काढण्यास प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात. त्याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात. त्यानंतर सर्वजण चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करतात. यानंतर पुन्हा सर्वजण श्री पावणाई देवालया समोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो. त्यानंतर शिवकळ (अवसर) काढण्याची कला सादर करतात. या शिवकळेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके (प्रतिकात्मक आंब्याचा टाळ) ढोलताशाच्या गजरात मिराशी कुटुंबियांकडे नेला जातो. तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो. या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते. या दिवशीच्या आदल्या दिवशी सायंकाळी देसरुढ काढण्यात येते. शेती हंगाम असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा भावई उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स