ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओझर विद्यामंदिरच्या  भूमिका  कोचरेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओझर विद्यामंदिरच्या भूमिका कोचरेकर हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

प्रकाशन: 15 Jul 2023 05:39 PM
वाचन संख्या 29

मसुरे | प्रतिनिधी: सन http://localhost/news/public/uploads/2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी भूमिका सदानंद कोचरेकर हिला गुणवत्ता यादीत स्थान मिळून शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. याच वर्षी घेण्यात आलेल्या एन एम एम एस (राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळवली होती. एकाच वर्षात दोन शिष्यवृत्ती मिळवणारी ती शाळेच्या इतिहासातील पहिलीच विद्यार्थिनी आहे. शाळेची गुणवत्ता आणि उज्वल यशाची परंपरा कायम राखत एक उपक्रमशील शाळा म्हणून ओझर विद्यामंदिरच्या नावलौकिकात वाढ केल्याबद्दल आणि तिच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्था, शालेय समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्वांनी तिचे हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डी डी जाधव यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स