ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर 18 जुलैला सुनावणी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर 18 जुलैला सुनावणी

प्रकाशन: 15 Jul 2023 05:51 PM
वाचन संख्या 37

सहसंपादक नवलराज काळे: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतच्या सुनावणीसाठी आता पुढची तारीख देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 18 जुलै रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या या राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या प्रकरणांवर 18 जुलैला तरी सुनावणी होईल का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने याआधी एप्रिल आणि मे महिन्याची तारीख सुनावणीसाठी दिली होती, मात्र, त्या दिवशीही सुनावणी होऊ शकली नाही.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेचओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. ओबीसी आरक्षणाची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा पंदील दिला.92 नगर परिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि http://localhost/news/public/uploads/207 नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, 92 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स