ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या कार्याची गवर्नर चिफ़ असिस्टंट रो. अशोक नाईक यांनी केली प्रशंसा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या कार्याची गवर्नर चिफ़ असिस्टंट रो. अशोक नाईक यांनी केली प्रशंसा.

प्रकाशन: 14 Jul 2023 10:00 AM
वाचन संख्या 155

नवलराज काळे | सहसंपादक : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा पदग्रहण सोहळा ८ जुलैला वैभववाडी महाविद्यालयाच्या नूतन सभागृहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून रो.श्री संजय शिवाजी रावराणे यांनी पदभार स्वीकारला.

पदग्रहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून गवर्नर चीफ असिस्टंट रो. अशोक नाईक उपस्थित होते. इरिया हेड रो. प्रणय तेली, असिसस्टंट गव्हर्नर रो. राजन बोभाटे, रो.संजय पुनाळेकर, रो. गावडे, रो.डॉ.विध्याधर तायशेटे, रो.दिपक बेलवलकर, रो.निता गोवेकर, रो.प्रविण पोकळे, रो.ॲड अंधारी, रो.बांदेकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

या वेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष म्हणून रो.संजय रावराणे, सेक्रेटरी रो. प्रशांत गुळेकर, खजिनदार म्हणून रो. तेजस अंबेकर व अन्य सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पदभार देण्यात आला.

मावळते अध्यक्ष रो. संतोष टक्के यांनी वैभववाडी तालुक्यात रोटरी क्लब स्थापन करणेसाठी डॉ विध्याधर तायशेटे व कणकवली क्लब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून कणकवली व कुडाळ क्लबच्या सहकार्याने आपण रोटरी जाणून घेतली आणि रोटरीला अभिप्रेत काम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात जे प्रकल्प राबविले. त्या साठी वैभववाडी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले म्हणूनच डिस्ट्रीक गवर्नर रो. व्यंकटेश देशपांडे यांनी त्यांची दखल घेतल्याचे सांगितले. माजी सेक्रेटरी व नूतन अध्यक्ष रो. संजय रावराणे यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या प्रकल्पाचा आढावा घेऊन आपण येत्या वर्षभरात वैभववाडी तालुक्यातील शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील प्रकल्प राबविणार असल्याचे सांगीतले.

प्रमुख पाहुणे गवर्नर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे गेल्या वर्षभरातील काम व आजचा देखणा कार्यक्रम पाहून या क्लबला दहा ते पंधरा वर्ष झाल्या सारखे वाटत असल्याचे सांगितले. मी गेले वर्षभर या क्लबचे सर्व कार्यक्रम पहात आहे. रो. संतोष टक्के व सहका-यांनी पहिल्या वर्षातच रोटरी समजून घेत गौरवास्पद काम केल्याचे सांगितले. त्यांनी जवळपास १०० पेक्षा जास्त प्रकल्प गेल्या दिड वर्षात राबविले आहेत. एस टी स्टँड सुशोभिकरण, मॅरेथॉन, एम.एच.एम या महत्वपुर्ण उपक्रमांची दखल गवर्नर यांनी घेतल्याचे सांगितले. इरिया हेड रो. प्रणय तेली यांनीही वैभववाडी रोटीरी क्लबच्या कार्याचे कौतूक केले. असि. गवर्नर रो.राजन बोभाटे, जीएसआर रो.डॉ. विध्याधर तायशेटे यांनी आपल्या मनोगतात वैभववाडी क्लबचे कौतुक करुन आपण या पुढेही या क्लबला सहकार्य करु असे सांगितले.

या वेळी वैभववाडी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपिनेचे वैभववाडी उपविभागातील प्रधान तंत्रज्ञ श्री गणेश अनंत पाटेकर यांच्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करुन सप्तनीक सत्कार करण्यात आला. तसेच वैभवावडीतील सौ. सुवर्णा सुधाकर रावराणे यांचा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला नव्याने दाखल झालेल्या श्री.संतोष कोलते, श्री.विजयसिंह रावराणे, सौ नेहा रावराणे, सौ. संजना रावराणे, सौ स्नेहल खांबल या सदस्यांचे पीन लाऊन स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ वैभवववाडीला विशेष सहकार्य केल्या बध्दल रो. सौ सलोनी टक्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय्य विध्यार्थ्यांना स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य व छत्री, माध्यमिक विद्यालयांना कूलर प्रदान करण्यात आले. ट्रेझरर रो. प्रशांत गुळेकर यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स