ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाच्या वतीने  जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाच्या वतीने जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन.

प्रकाशन: 12 Jul 2023 01:17 PM
वाचन संख्या 171

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघ प्रशिक्षित बेरोजगार युवक तथा शिक्षकांच्या बाजुने उभी असल्याची जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका.

मालवण | सुयोग पंडित : सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीच्या निर्णयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील जि. प. शाळांमधील मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षकांच्या रिक्तपदी जि. प./खाजगी अनुदानित शाळांतील ७० वर्षांच्या आतील सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात येत्या १५ दिवसांत रू. २०, ०००/- मानधनावर नियुक्ती करण्याचे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी/सी.ई. ओ. यांना ७ जुलै २०२३ च्या परिपत्रकाद्वारे आदेशीत केलेले आहे. या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा विरोध असून हा निर्णय शासनाने विनाविलंब रद्द करावा किंवा सेवानिवृत्तांऐवजी ‘बेरोजगार युवकांना नियुक्ती’ देण्याचे सुधारित आदेश प्रसृत करावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने निवेदना द्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे व जिल्हा कार्यवाह विजय मयेकर यांनी संघटनेच्या वतीने तसे निवेदन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना सादर केले आहे.

रिक्त जागी ज्या पद्धतीने सेवानिवृत्तांची कंत्राटी पद्धतीने फेरनियुक्ती करण्यात न्यायालयाची मान्यता गृहीत धरली जात आहे,त्याच पद्धतीने प्रशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना नियुक्ती देण्यास सामाजिक न्याय्य तत्त्वानुसार कोणतीही कायदेशीर अडचण दृष् दिसत नाही. राज्यातील प्रशिक्षित लाखो शिक्षक उमेदवार २०१२ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असतांना त्यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या सबबीखाली दुर्लक्ष करून सेवेच्या संधीपासून वंचित ठेवणे सामाजिक व नैसर्गिक समानतेच्या तत्वाविरुद्धच आहे असे त्या निवेदनात नमूद केले आहे. शासनाने ७ जुलै २०२३ च्या परिपत्रकामध्ये सेवानिवृत्तांमधून ऐवजी बेरोजगार प्रशिक्षित उमेदवारांमधून अशी उपयुक्त सुधारणा करावी तथा फेरविचार करावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक या शासन आदेशाला प्रतिसाद न देता १०/११ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार युवकांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स