ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुणवंतांचा सत्कार ; संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी केले विध्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुणवंतांचा सत्कार ; संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी केले विध्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन.

प्रकाशन: 10 Jul 2023 05:40 AM
वाचन संख्या 281

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील ‘माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल’, या प्रशालेच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेतील मागील वर्षात राज्य, जिल्हा तसेच तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुद्धा गौरविण्यात आले. कमिटी सदस्य बाबाजी भोगले, डॉ.वीणा मेहंदळे, जगदीश चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर, तातू भोगले, तसेच पालक भिकाजी आंगणे, दिनेश बागवे, महेश मुळीक, विनोद चेंदवनकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभुगांवकर तसेच मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेच्या शिक्षिका पार्वती कोदे, गौतमी प्रभुगांवकर, संजना प्रभुगावकर, सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, तनुश्री नाबर, सविता मेस्त्री , रेश्मा बोरकर तसेच कर्मचारी वसंत प्रभुगांवकर, समीर सावंत, संतोष परब, करुणा चव्हाण, पाटकर यासर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी मांजरेकर यांनी केले आणि सायली म्हाडगुत यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स