ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे केंद्रीय समितीकडून कौतुक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे केंद्रीय समितीकडून कौतुक.

प्रकाशन: 05 Oct 2021 05:53 PM
वाचन संख्या 113

गावातील लाभार्थ्यांसोबतही पथकाने साधला संवाद..

बांदा : राकेश परब : केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या योग्य अंमलबजावणी बद्दल केंद्र सरकारच्या पंचायत राज व ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेल्या नॅशनल लेव्हल मॉनिटर टीमने वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या घरकुल, विहीर, शेती आदींसह अन्य कामांची पाहणीही पथकाने केली. गावातील संबंधित लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नीटनेटक्या कारभाराबाबत पथकाने कौतुक केले.
यावेळी सरपंच अक्षता आरोंदेकर, उपसरपंच शुभदा आईर, विनेश गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, संस्थेचे प्रतिनिधी ज्ञानसुंदरवेल शिवनाथन, एस अबिद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सागर सावंत, डिस्ट्रिक्ट प्रसाद कांबळे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, अधीक्षक जितेंद्र पाटील, सुनील खरवत, उद्देश सावंत, वाडीकर, नम्रता परब, संजीवनी चव्हाण आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का ? संबंधित लाभार्थ्यां पर्यंत योजना पोहोचते का ? याची चाचपणी करण्यात आली. ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स