ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंगणेवाडीतील भराडी देवीचे मंदिर ७ ऑक्टोबरला नाही तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी होणार खुले...!

आंगणेवाडीतील भराडी देवीचे मंदिर ७ ऑक्टोबरला नाही तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी होणार खुले...!

प्रकाशन: 05 Oct 2021 04:25 PM
वाचन संख्या 168

ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री भास्कर आंगणे यांनी दिली माहिती…

पोईप | ओंकार चव्हाण : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदीरे ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबतची घोषणा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली आहे.

कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना ७ ऑक्टोबर २०२१ पासून शासनाने मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रति वर्षाप्रमाणे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर घटस्थापनेनिमित्त ७ ऑक्टोबर पासून २४ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत पारंपारिक धार्मिक पूजा विधी होणार असल्याने नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे आदी विधी बंद राहणार आहेत. २५ ऑक्टोबर पासून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांना श्री भराडी देवीचे दर्शन घेता येईल. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय ,आंगणेवाडी यांच्यावतीने अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स