ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा येथील भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन ; तहसीलदारांनी दिली कार्यवाहीची ग्वाही.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली बांदा येथील भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन ; तहसीलदारांनी दिली कार्यवाहीची ग्वाही.

प्रकाशन: 08 Jul 2023 04:46 AM
वाचन संख्या 197

बांदा | राकेश परब : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेशी मुस्लिम मतदार सापडल्याच्या गंभीर पार्श्वभूमीवर बांदा शहरात मतदार यादीचे सर्वेक्षण करून बोगस मतदारांची नांवे यादीतून काढून टाकावी अशा मागणीचे निवेदन काल भाजपचे बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले.

या निवेदनात त्यांनी म्हटले की सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गांवात बांगलादेशींची नांवे मतदार यादीत सापडत आहेत. बांदा शहरात देखील परप्रांतीयांचे वास्तव्य वाढले असून या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे सर्वेक्षण करणे ही काळाची गरज आहे. अनेकजण आधारकार्ड व मतदान कार्ड लिंक करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत मतदार यादीचे तातडीने सर्वेक्षण करावे. तसेच मतदारांचे तपशील प्रत्यक्ष पत्त्यावर जाऊन तपासावे व संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिस कारवाई करावी. आधार नोंदणी सक्तीची करून त्याकरीता विशेष कार्यक्रम आखावा. यासाठी बांदा ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ आपल्याला पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही दिली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपाली शिरसाट, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर नरसिंह उर्फ बाबा काणेकर, गुरु कल्याणकर, सावंतवाडीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार श्री. पाटील यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन काणेकर यांना दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स