व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा पंचक्रोशीतील व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी सुरेल गीतगायन करून गुरू वंदना दिली. इयत्ता १ ली ते १० व्वी च्या विद्यार्थ्यांनी भाषणातून त्यांचे विचार व्यक्त केले. काही मुलांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले तर काहिंनी आवाजात गाणे म्हणुन गुरू स्तुती केली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे आभार देखील मानले. प्रशालेच्या प्री- प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी श्लोक म्हणुन आपल्या शिक्षकांना भेटकार्ड देत त्यांचे आभार व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी छान छान भेटकार्ड बनविली होती.
प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीमती रसिका वाटवे यांनी एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची गोष्ट सांगून गुरू भारतीय संस्कृतीतील शिष्य परंपरा सांगितली. उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगांवकर यांनी आपल्याला चांगले शिक्षण देणारे सर्वच लहान थोर आपले गुरू आहेत व त्यांचा आपण आदर केला पाहिजे असे विचार मांडले. नाबर प्रशालेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षिका सौ हेलन रॉड्रिग्ज यांनी त्यांच्या कारकिर्दीतली जास्तीत जास्त वर्षे शाळेसाठी वाहून घेतली म्हणून या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ स्नेहा नाईक यांनी केले. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार सितारा मांद्रेकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)