ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कारने सन्मानित
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कारने सन्मानित

प्रकाशन: 03 Jul 2023 09:31 PM
वाचन संख्या 43

शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदान बद्दल सन्मान

बांदा / प्रतिनिधी: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या श्री. राकेश परब यांना ‘पर्यावरण मित्र सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

कुडाळ येथील मराठा हॉल मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्री. राकेश परब हे गेली २३ वर्षे शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण अशा विविध उपक्रमात सहभागी होऊन आपले कार्य करत आहेत. या कार्यांची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांनी त्यांना सन्मानित केले आहे.

यावेळी व्यासपीठावर श्री. संदेश किंजवडेकर, कुडाळ तालुका गट शिक्षणा अधिकारी, श्री.विनायक परब, सिंधुदुर्ग जिल्हा – परब मराठा समाज,श्री. डॉ. बापू अशोक भोगटे ,पर्यावरण प्रेमीश्री. रामचंद्र परब ,संघटक – परब मराठा समाज कोकण विभाग अध्यक्ष बापू परब, जोईल डीस्लील्वा, आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण , विषयक कार्ये करणाऱ्या संस्था ना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू परब यांनी तर आभार श्री गावडे यांनी मानले.फाटो कँप्शन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने श्री. राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कारने सन्मानित करताना मान्यवर छाया :-

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स