ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गुरू वीण जगी थोर काय!पळसंब शाळा न . १ मध्ये  गुरुपौर्णिमा उत्साहात
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गुरू वीण जगी थोर काय!पळसंब शाळा न . १ मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

प्रकाशन: 03 Jul 2023 09:20 PM
वाचन संख्या 52

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पळसंब शाळा न . १ मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमेच पुजन व पुष्पहार माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते करण्यात आले. त्यानतंर पळसंब शाळा येथे कामगिरीवर आलेल्या सौ . बागवे मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भक्ती गीतांची मैफिल रंगली. मुख्याध्यापक श्री . विनोद कदम यानी तबला साथ व सौ . पवार मॅडम हार्मोनियम वादन करत साथ दिली. कु .दिव्या परब व सानिका सावंत हिने माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांना औक्षण करत गुरुवंदना घेतली. त्यावेळी श्री .गोलतकर यांनीपरमात्म्याला ज्याने ही सृष्ठी निर्माण केली.आई वडीलांनी ज्यानी मला जन्म दिला .गुरुवर्यानी ज्यांनी विद्या दिली .आपल्या सर्वाना ज्यांच्या मुळे या जगण्याचा अर्थ मिळाला या सर्वाना माझ्या कडून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा असे मनोगत व्यक्त केले.शाळा अध्यक्ष श्री रविकांत सावंत, उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाध्यपूजन करत गुरुवंदना घेतली.त्यावेळी पालक माता सौ . अमृता वने, सौ . प्रिया चव्हाण, सौ . नदिनी लाड, नमीता सावंत, आशा पळसंबकर, सानीका सावंत, काजोल मुणगेकर, सविता जंगले, गौरी परब, रुपा सावंत, शाळेतील मुले, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स