ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न!

प्रकाशन: 03 Jul 2023 09:45 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे  गुरुपौर्णिमा उत्सव  विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानि संपन्न झाला. स्वामी समर्थ नामाच्या जयघोषाने मठाचा परिसर  दुमदुमून गेला होता. उत्सव निमित्त स्वामी समर्थ मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.  सकाळ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने हजारो भाविक स्वामी चरणी नतमस्तक झाले.  पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्री ची पादुका पूजा, अभिषेक, श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायण सांगता झाली. त्यानंतर नामस्मरण, महाआरती महाप्रसाद तसेच दुपारी देवगड तालुक्यातील दहावी परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांच्या हस्ते झाला. सायंकाळी भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांचा दिंडी कार्यक्रम झाला.  श्री स्वामी समर्थ हडपीड मठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स