ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडपीड श्री स्वामी समर्थ मठ उद्या येथे गुरुपौर्णिमा!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ उद्या येथे गुरुपौर्णिमा!

प्रकाशन: 02 Jul 2023 06:45 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त उद्या ३ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे श्री स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्रीं ची पादुका पूजा, अभिषेक, श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने १ ते ३ जुलै या कालावधी आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायण सांगता, नामस्मरण, महाआरती महाप्रसाद तसेच दुपारी देवगड तालुक्यातील दहावी परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरगांव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांचा दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ हडपीड मठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स