ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब गांवच्या श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक - कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान ; नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी केला सन्मान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब गांवच्या श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक - कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान ; नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांनी केला सन्मान.

प्रकाशन: 02 Jul 2023 06:18 PM
वाचन संख्या 169

आचरा | प्रसाद टोपल व मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या श्री. जयंती देवी कला-क्रीडा मंडळाचा आज पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान करण्यात आला. कुडाळ येथील मराठा हाॅल मध्ये नैसर्गिक र्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी व सेवा, वृक्षारोपण, आरोग्य , सांस्कृतिक , कला, क्रीडा , शैक्षणिक क्षेत्रात पळसंबचे हे नोंदणीकृत श्री .जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे नेहमीच अग्रेसर आहे. या मंडळात गांवाबाहेर स्थायिक मूळ पळसंब निवासी सदस्य, ग्रामस्थ सदस्य व मंडळाचे पदाधिकारी नेहमीच सामाजिक क्षेत्रातील काळानुरुप गरजा ओळखून काम करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप असे सन्मानाचे स्वरुप होते.

हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री . प्रकाश कापडी , सामाजिक कार्यकर्ते श्री .प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री . उल्हास सावंत, सचिव श्री . चंद्रकांत गोलतकर, श्री. अमित पुजारे, श्री . हितेश सावंत, श्री . शेखर पुजारे, श्री रुपेश पुजारे, गोलतकर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल श्री. जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसंब यांची सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई स्थित पळसंब वासियांनीही प्रशंसा केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स