ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचा भविष्य काळातील 'आश्वासक चेहरा' शरद पवार ; राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नवीन फळीसाठी पुन्हा कंबर कसणार असल्याचे केले स्पष्ट.

राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचा भविष्य काळातील 'आश्वासक चेहरा' शरद पवार ; राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नवीन फळीसाठी पुन्हा कंबर कसणार असल्याचे केले स्पष्ट.

प्रकाशन: 02 Jul 2023 05:38 PM
वाचन संख्या 92

भाजपा मधील ज्येष्ठ, निष्ठावंत तसेच शिंदे गटातील उत्सुक आमदार यांची मात्र आता आपल्याला चिंता वाटते असे केले प्रतिपादन.

पुणे | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे शरद पवार यांनी फुटीरता, बंड, पक्ष फुटणे अशी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादी काॅन्ग्रेसमधील जे आता भाजपाला पाठिंबा देत आहेत त्यांना इ डी चौकशीचा ससेमीरा लागू नये अशी अस्वस्थता होती आणि त्याला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचक वक्तव्ये असल्याचे कारण शरद पवार यांनी व्यक्त केले.

भाजपाने जर राष्ट्रवादी काॅन्ग्रेसच्या आमदारांना सरकारमध्ये सन्मान व मंत्री पदे देत स्विकारले आहे तर त्याचा अर्थ राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्ष संपूर्ण स्वच्छ आहे हे त्यांना व शिंदे गटाला मान्य असल्याचाही राजकीय टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की आव्हाने आले की आपल्याला आणखीन हुरूप मिळतो त्यामुळे पक्षाचा ‘आश्वासक चेहरा’ आपणच आहोत असे मार्मिक भाष्य केले. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना थेट मंत्री पदे मिळाल्यामुळे आता भाजपा मधील ज्येष्ठ, निष्ठावंत तसेच शिंदे गटातील उत्सुक आमदार यांची मात्र आता आपल्याला चिंता वाटते असे उपहासात्मक प्रतिपादन त्यांनी केले.

उद्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेत पुन्हा आपण नव्याने पक्ष बांधणी करुन व लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काॅन्ग्रेसची नवीन फळी देशासमोर उभी करणार असल्याचे ते म्हणाले. या दरम्यान आपण जे सोडून गेलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वगैरे वेळ घालवणार नसून पक्षांतर्गत शिस्तीला धरुन निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स