ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी कालवश ; मराठी व हिंदी सिनेमात होते उल्लेखनीय योगदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी कालवश ; मराठी व हिंदी सिनेमात होते उल्लेखनीय योगदान.

प्रकाशन: 30 Jun 2023 08:16 AM
वाचन संख्या 349

मुंबई | ब्युरो न्यूज : भारतीय सिनेमा सृष्टीतील नावाजलेले मराठी नांव आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. १९५७ ते १९७३ अशी १६ वर्षे त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले होते.

अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. काल २९ जूनला दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली कित्येक वर्षे त्या मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची वार्ता माध्यमांना दिली.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षांपासून त्या हिंदी सिनेमात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स