ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
करुळ घाटात ३५० फूट खोल दरीत कार कोसळून दरीत फेकले गेले कलमठ येथील   जोडपे ; वैभववाडी पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळने केले तत्काळ बचाव कार्य..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

करुळ घाटात ३५० फूट खोल दरीत कार कोसळून दरीत फेकले गेले कलमठ येथील जोडपे ; वैभववाडी पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळने केले तत्काळ बचाव कार्य..!

प्रकाशन: 30 Jun 2023 05:49 AM
वाचन संख्या 625

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाटात काल रात्री ०८ :४५ वाजता एक वॅगनार कार , ३५० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची खबर वैभववाडी पोलिस स्टेशनला कळल्यानंतर त्यांनी सह्याद्री जीव रक्षक , करुळ टीम यांच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. या घटनेत कारचा चालक सुदैवाने सुरक्षितरित्या रस्त्यानजिकच फेकला गेल्याने बचाव कार्य नेमके कुठे करायचे ते कळणे शक्य झाले.

कारमधून दरीत फेकले गेलेल्या कणकवली येथील जोडप्याची बचावकार्यातून केवळ थोड्याच अवधीत दोरीच्या सहाय्याने वैभववाडी पोलिस व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळने सुटका केली. सुदैवाने दोघांनाही किरकोळच जखमा झाल्या होत्या. दोन्ही जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक तपासणी व उपचारासाठी आणले गेले. दोघेही सुखरूप असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

या घटनेनंतर वैभववाडी पोलिसांची तत्परता व सह्याद्री जीवरक्षक टीम करुळ यांचे थरारक बचावकार्य याबद्दल जखमींनी आभार मानले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स