बांदिवडे गांवात शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई संस्थेमार्फत शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय दफ्तर आणि वह्या वाटप ; पालयेवाडीतील श्री.सुभाष वसंत परब यांचे विशेष प्रयत्न..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे गांवातील शाळा आणि अंगणवाडीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिवप्रतिष्ठान, फणसे मुंबई यांच्या वतीने सेवाभावी पद्धतीने मोफत शालेय दफ्तर आणि वह्या वाटप करण्यात आले. १७ जूनला दुपारी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. पालयेवाडीतील श्री.सुभाष वसंत परब यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी बांदिवडे सरपंच आशू मयेकर उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर , ग्रामपंचायत सदस्य नारायण परब , श्रुती गांवकर, स्वप्नील मुणगेकर, किरण पवार , रंजन प्रभू, चंद्रकांत परब, सुभाष परब , आबु घागरे, सत्यवान सावंत, माजी सरपंच संजय राणे, संजय गुरव, परब असे मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)