जि.प.मसुरे क्र.१ केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप ; विद्यार्थिनी सौ सुषमा सावंत निगडे देशमुख यांचा अनोखा उपक्रम.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे नं.१ या शाळेच्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी सौ. सुषमा सावंत निगडे-देशमुख यांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मसुरे क्र.१ प्रशालेतील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले.
हे शैक्षणिक साहित्य पूनम सावंत प्रभाग अध्यक्ष ठाणे मनसे, श्री.सुरेश चव्हाण, संध्या ग.परब(माटेकर)यांनी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत यांना सुपुर्द केले. या वेळी बोलताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत म्हणाल्या सुषमा सावंत निगडे देशमुख या प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी असून आज त्यांनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले असून मिळालेल्या या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी योग्य तो लाभ घेऊन आपली शैक्षणिक उन्नती साधावी. मसुरे गावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर यांनी बोलताना सांगितले की सुषमा सावंत यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या प्रशालेमध्ये शैक्षणिक उन्नती साधावी त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी केलेला हा उपक्रम दिशादर्शक आहे.
हे साहित्य संध्या परब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, छत्री, दप्तर आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सन्मेष मसुरेकर, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, श्री.विनोद सातार्डेकर, श्री.गोपाळ गावडे सर,सौ.रामेश्वरी मगर मॅडम, शैलेश ठाकुर, संतोष नार्वेकर, नंदादीपक साटम, हरिश्चंद्र दुखंडे, मृणाल परब, दीक्षा दुखंडे, शामल आईर, आसावरी ठाकुर, नमिता तोंडवळकर, सायली दुखंडे,हेमलता दुखंडे, लक्ष्मण शिंगरे, लावण्या शिंगरे, स्वरा नार्वेकर असे मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)