कुसूर विकास मंचतर्फे गांवातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कुसूर गावातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कुसूर विकास मंच संस्थेतर्फे मोफत शालेय साहित्य वह्या, पेन, पेन्सिल बॉक्स, खोडरबर, शार्पनर, कलर्स इत्यादी वाटप कार्यक्रम आज संपन्न झाला.
पिंपळवाडी प्राथमिक शाळा, ज्ञानलता विद्यामंदिर कुंभारी, बाजारवाडी प्राथमिक शाळा, मळेवाडी प्राथमिक शाळा, ज्ञानलता विद्यामंदिर, खडकवाडी येथील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील, सरचिटणीस श्री चंद्रकांत रासम, खजिनदार श्री योगेश आंब्रसकर, कार्याध्यक्ष महेश रावराणे, श्री प्रवीण रासम, विद्याधर काटे, श्री चंद्रकांत धामणे, श्री रमेश घाग, श्री जगन्नाथ डांगे, श्री देवेंद्र कांबळे, तसेच सर्व शाळांचे शिक्षकवर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सभासद आणि हितचिंतक श्री विष्णू साळुंखे, श्री पुंडलिक घाग, श्री मधुकर सावंत, श्री चंद्रकांत रासम, श्री योगेश आंब्रसकर, श्री सुधीर साळुंखे, सौ प्रियंका कदम, श्री दशरथ राशिवटे, श्री प्रसाद साळुंखे, श्री लहू दिनकर साळुंखे, श्री निमेश साळुंखे, श्री संदीप दळवी, श्री अरूण साळुंखे, श्री उमेश मनोहर पाटील, श्री नरेंद्र साळुंखे, सौ सुरेखा कदम, श्री संजय चाचे, श्री शामभाऊ पाटील, श्री दिपक कदम यांनी विशेष सहकार्य केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)