ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र वनविभागात मोठी भरती ; आजपासून भरता येतील ऑनलाईन अर्ज.

महाराष्ट्र वनविभागात मोठी भरती ; आजपासून भरता येतील ऑनलाईन अर्ज.

प्रकाशन: 10 Jun 2023 07:16 AM
वाचन संख्या 1309

दिड वर्ष रखडलेल्या भरती प्रक्रियेला अखेर मिळाला मुहूर्त.

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र वनविभागात ( महाराष्ट्र फाॅरेस्ट डिपार्टमेंट) मेगा भरती होणार असून, राज्यातील २ हजार ४१७ पदांसाठी आज शनिवार (दि.१०) पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. ३० जूनपर्यंत इच्छुक उमेदवारांना ‘www.mahaforest.gov.in’ ह्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

या भरतीप्रक्रियेनंतर अतिरिक्त पदांचा भार असलेल्या वनकर्मचाऱ्यांवरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. तसेच राज्यातील वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत. गेल्या दिड वर्षापासून वनविभागातील भरतीप्रक्रिया रखडली होती. तत्कालीन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर ही घोषीत भरती प्रक्रिया रखडली होती. अखेर वनविभागाचे नागपूर येथील मानव संसाधन व्यवस्थापनचे उपवनसंरक्षक डॉ. एस. आर. कुमारस्वामी यांनी भरतीप्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे वनविभागाच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. वनविभागाची भरतीप्रक्रिया राज्यस्तरीय आणि प्रादेशिक पदानुसार राबविली जाणार आहे. राज्यस्तरीय पदांमध्ये लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक यांचा, तर प्रादेशिक पदांमध्ये लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक यांचा समावेश असणार आहे. वनसंपदेच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्या वनरक्षकांची सर्वाधिक २ हजार १३८ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्काच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहे.

दरम्यान, लेखापाल, वरिष्ठ व कनिष्ठ सांख्यिकी, कनिष्ठ अभियंता या पदासाठी २०० गुणांची ऑनलाइन लेखी परीक्षा होणार आहे. लघुलेखक आणि सर्वेक्षक या पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून, टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना ८० गुणांची व्यावसायिक चाचणी द्यावी लागणार आहे. वनरक्षक पदासाठी १२० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर ८० गुणांसाठी धाव चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना ५ तर महिला उमेदवारांना ३ किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेत पार करावे लागणार आहे.

पदनिहाय उपलब्ध संख्या खालीलप्रमाणे आहे.

लघुलेखक (उच्च)- १३
लघुलेखक (निम्न)- २३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ०८
वरिष्ठ सांख्यिकी सहायक- ०५
कनिष्ठ सांख्यिकी सहायक- १५
लेखापाल- १२९
सर्वेक्षक- ८६
वनरक्षक- २,१३८

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स