ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक सोमवारी घेणार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ; १२१ शाळांतील शिक्षक प्रश्नाबाबत उठवणार आवाज.

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक सोमवारी घेणार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ; १२१ शाळांतील शिक्षक प्रश्नाबाबत उठवणार आवाज.

प्रकाशन: 09 Jun 2023 07:59 PM
वाचन संख्या 471

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे आता आक्रमक आग्रही झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांच्या शिक्षक प्रश्नाबाबत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक हे सोमवार १२ जूनला सकाळी ११:३० वाजता ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १२१ शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध केलेले नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षक उपलब्ध न झाल्यास या शाळा काही काळाने बंद होणार असून यावर आवाज उठविणे गरजेचे आहे तरी जिल्ह्यातील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स