ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वाफोली ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा  सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

वाफोली ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंतांचा  सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 09 Jun 2023 07:24 PM
वाचन संख्या 270

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली ग्रामपंचायत सभागृहात इयत्ता १० वी व १२ तील सावंतांचे सत्कार सोहळा  नुकताच संपन्न झाला. नुकताच दहावी व बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी चांगले शैक्षणिक यश संपादन केले आहे. हा गावाचा अभिमान आहे. आत्ताचे विद्यार्थी उद्याचा गांव विकसित करणारे भविष्यातील पिढी आहे अशा शब्दांत  शैक्षणिक वाटचालीसाठी गांवच्या वतीने या विद्यार्थांना सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थांनी पुढील जीवनात आवडीचे करियर करण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधावी. वाफोली गावातील चांगले  गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही लाल मातीतील रत्ने आहेत. भविष्यात चांगले करिअर करीत असताना हुरहुरून न जाता यशाचे सातत्य टिकविले पाहिजे असा मोलाचा सल्ला व मार्गदर्शन श्री कांतीलाल वळवी(विस्तार अधिकारी पंचायत समिती)  यांनी केले तसेच वाफोली गावातील दहावी,व बारावी परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वळवी यांनी केले.

गुणवंत विद्यार्थी वेदिका खानोलकर, मानसी देसाई, योग गवस, रमेश गवस, अवंती गवस, हर्षद गवस, गीता गवस, क्षितिजा सावंत, मितेश आईर, किरण परब,दत्ताराम परब, मयंक आईर, इशिता सावळ, विवेक ठाकूर, नलिनी घोगळे, आस्था वझरकर, जीवन पाटील, रुची सावंत या विद्यार्थांचा गुलाब पुष्प, सन्मान चिन्ह व सुपारीचे रोप देत सरपंच,उपसरपंच व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे,स्नेहा आईर, पोलीस पाटील आना गवस, प्रमुख पाहुणे प्रा.देसाई सर, सौ अदिती पिळणकर,सौ.
समिधा आमडोसकर असे मान्यवर  उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा ऑपरेटर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले आणि विनेश गवस यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 21
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स