ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शेर्ले - मडुरा मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत संरक्षक भिंत तोडल्याने धोका बळावला

शेर्ले - मडुरा मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत संरक्षक भिंत तोडल्याने धोका बळावला

प्रकाशन: 06 Jun 2023 04:18 PM
वाचन संख्या 35

बांदा : राकेश परब बांदा शेर्लेमार्गे मडुरा रस्त्यावरील मारुती मंदिर नजीकचा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पूलाच्या खालील भागातील स्लॅब कोसळल्याने लोखंडी शीगा बाहेर आल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या पूलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी व पावसाळ्यानंतर तातडीने पूलाचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच उदय चिंदरकर यांनी केली आहे.     

बांदा शेर्लेमार्गे मडुरा रस्त्यावरील पूल स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच सन १९३० मध्ये वालावलकर कुटुंबियांकडून बांधण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजेच या पूलाला तब्बल ९३ वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईची पाहणी सरपंच उदय चिंदरकर, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, उल्हास वालावलकर यांनी केली. यावेळी पूलाची नाजूक स्थिती निदर्शनास आली.      

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने पूलालगत असलेली संरक्षक भिंत तोडली आहे. त्यामुळे पूलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप यावेळी प्रकाश वालावलकर यांनी केला. या मार्गावरुन दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात सदर पूल कोसळल्यास मडुरा दशक्रोशीतील नागरिकांसमोर समस्या उभी राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूलाची पाहणी करुन तात्पुरती डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.चौकट     शेर्ले – मडुरा दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर आहे. शेर्लेपासून सुमारे एक किमी रस्त्याचे खडीकरणाचे काम महिनाभरात संबंधित ठेकेदाराने रडतखडत केले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आता पुढच्या वर्षीच डांबरीकरण होणार हे निश्चित आहे. तत्पूर्वीच पूलाचे काम पूर्णं करण्यासाठी पाठपुरावा करणार असे सरपंच उदय चिंदरकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स