ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ७० युवतींना फॅशन डिजाईनिंगचे मोफत प्रशिक्षण !

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ७० युवतींना फॅशन डिजाईनिंगचे मोफत प्रशिक्षण !

प्रकाशन: 07 Jun 2023 02:24 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर

कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत मे महिन्यात युवतींना १५ दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहणे म्हणून अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी व वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर , सार्था कदम , आनंद तांबे ,अच्युत देसाई, किशोर कदम , आर्या कदम तसेच मार्गदर्शिका सायली तळवडेकर मॅडम या उपस्थित होत्या. अमोल भोगले व वैभवी पेडणेकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त वैभवी पेडणेकर हिचा सार्था कदम यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बॅचचे विद्यार्थी स्वतः डिजाईन केलेल्या ड्रेस मध्येच कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता. हिमानी, वैष्णवी ,सुजाता यांनी आपला अनुभव व्यक्त केला. अवघ्या 15 दिवसात खूप काही प्रोफेशनल दर्जाच्या गोष्टी बॅच मध्ये शिकता आल्या व उपक्रमाचा फायदा झाला म्हणून त्यांनी कॉलेजचे आभार मानले.
यावेळी अमोल भोगले मनोगत व्यक्त करताना म्हणाले सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी युवक व युवतींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे यासाठी फ्लोरेट कॉलेज मार्फत संधी उपलब्ध झाली आहे त्याचा फायदा घ्यावा . मुंबई पुणे तील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.वैभवी पेडणेकर म्हणाल्या, प्रत्येक युवतीने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे.यासठी कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे ते काम फ्लोरेट कॉलेज यानी प्रशिक्षण आयोजीत करुन एक नवा आदर्श निर्माण केला. आहे.अशा उपक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा.तसेच कॉलेजच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. सार्था कदम यांनी नवीन करिअर संधी म्हणून जुलै 2023 पासून सुरु होणाऱ्या इंटिरिअर व फॅशन प्रोफेशनल डिप्लोमा – डिग्री कोर्सेस साठी जिल्ह्यातील सर्व दहावी – बारावी विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी आवाहन केले आहे. आभार कॉलेजच्या व्यवस्थापिका मनीषा देसाई यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स