ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महान गावातील वीज समस्या दूर करा!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महान गावातील वीज समस्या दूर करा!

प्रकाशन: 06 Jun 2023 03:47 PM
वाचन संख्या 32

सरपंच अक्षय तावडे यांनी वेधले लक्ष

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर मालवण तालुक्यातील महान गावातील वीज समस्या बाबत सरपंच अक्षय तावडे यांनी वीज वितरण कंपनीच्या मालवण कार्यालयास निवेदन देत वीज लाईन लगतची झाडे तोडण्याची मागणी केली आहे. निवेदन नुसार महान गावामधील वीज वाहिन्यांना टेकणान्या झाडाच्या फांदा अद्यापपर्यंत तोडल्या नाही आहेत. पावसाळा सुरु होणार असून त्यापूर्वी
वीज वाहिन्यांना टेकणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे.
महान गावासाठी सद्यस्थितीत मालवण विज केंद्रातून विज जोडणी दिलेली आहे. परंतु पावसाळ्यामध्ये कोणत्याही कारणास्तव विज गेल्यास विज कनेक्शन धारकांची गैरसोय होते. शासकीय नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करता येत नसल्याने नळकनेक्शन धारकांची गैरसोय होते. यासाठी पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीमध्ये विजपुरवठा मालवण विज केंद्रावरून खंडित झाल्यास तातडीने कणकवली विजकेंद्रावरून येणाऱ्या लाईन ने विज जोडणी देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी उपसरपंच अजित राणे, माजी प स सदस्य सुधीर साळसकर, सागर शिंदे, प्रसाद जाधव, निळकंठ घाडी, मंगेश साळसकर, मदन घाडी, संग्राम साळसकर, सुहास साळुंखे, शामा घाडी आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स